ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’, घरी पोहचल्यावर म्हणाल्या ..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी कार अपघातानंतर रुग्णलयात उपचार घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना रुग्णालयातून अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचंही दिसत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. सुदैवानं त्या यातून बचावल्या. त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं नंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं होत. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. आता मात्र त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, “माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. मी आता घरी आले आहे. डॉक्टर्स आणि नर्सच्या स्टाफनं जी सेवा दिली आणि जी माझी काळजी घेतली त्यासाठी टिना अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचेही आभार. तुमच्या सर्वांच्या उपकाराबद्दल मी ऋणी आणि कृतज्ञ आहे.”

Advt.

शबाना आझमी यांच्या गाडीला 18 जानेवारी रोजी एका ट्रकनं मागून धडक दिली होती. त्यांच्या गाडीसोबत जावेद अख्तर यांचीही गाडी होती. या अपघातात शबाना यांच्या तोंडाला जबरी मार लागला होता. त्यांचा ड्रायव्हर देखील जखमी झाला होता ज्याच्यावर उपचार सुरू होते.