गेटवे ऑफ इंडियाजवळ ‘किंग’ खानचा फेरफटका ! अवतारामुळं कुणीच ओळखलं नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. अलीकडेच शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला फेरफटका मारताना दिसला. परंतु चकित करणारी बाब अशी की, त्याला कोणीच ओळखलं नाही. त्याचे काही फोटोही समोर आले आहेत.

शाहरुखचे काही फोटो समोर आले आहेत. जे व्हायरल होताना दिसत आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं राखाडी रंगाची हुडी, व्हाईट टी शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राऊजर घातली होती. त्यानं यावेळी मास्क आणि सनग्लासेसदेखील लावले होते. यामुळं अगदी सहज कुणाच्याही लक्षात आलं नाही की, तो शाहरुख खान आहे.

अशीही माहिती आहे की, त्याच्या पठाण या आगामी सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं तो तिकडे गेला होता. सध्या त्याचे फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत हेही सांगितलं आहे की, हा शाहरुख आहे ते कळूनही येत नाही.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की, राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाणमध्ये दिसणार आहे.

You might also like