Shah Rukh Khan | “कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…’; शाहरुख खानने केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shah Rukh Khan | बॉलिवूडचा किंग म्हणून अशी ज्याची ओळख आहे असा शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनंतर पुनरागमन करणार आहे. तो त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुखने शरीरयष्टीवर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. शाहरुख खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. हा टीझर पाहून त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. यादरम्यान शाहरुख खानने आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. (Shah Rukh Khan)

 

काय म्हणाला, शाहरुख खान?
“मी कधीच अ‍ॅक्शनपटात काम केलं नाही. सुंदर प्रेमकथेवर आधारित चित्रपट, सामाजिक विषयावर आधारित चित्रपट मी केले. नकारात्मक भूमिका मी रुपेरी पडद्यावर साकारल्या. पण कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं,” अशी खंत शाहरुख खानने यावेळी बोलून दाखवली. (Shah Rukh Khan)

तसेच तो म्हणाला, “आता मी 57 वर्षांचा आहे. पुढील काही वर्षे मला अ‍ॅक्शनपटात काम करायचं आहे.
‘मिशन इम्पॉसिबल’सारखे चित्रपट मला करायचे आहेत. अगदी टॉपचे अ‍ॅक्शनपट चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.”
शाहरुख पुढील दहा वर्षे तरी फक्त अ‍ॅक्शनपट चित्रपटच करणार आहे.
तसेच टॉपचे अ‍ॅक्शनपट चित्रपट करण्याची इच्छा असल्याचे त्याने यावेळी बोलून दाखवले.
शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफसवर हिट होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan says nobody was taking me in action films he want to do such movies for next 10 years see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा