बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख कोणाकडे मागतोय काम ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – किंग खान ‘झिरो’ नंतर एकाही चित्रपटात दिसला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये त्याचे काही चित्रपट देखील फ्लॉप झालेत. मात्र, तो लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु तो चित्रपटातुन नव्हे तर वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत शाहरुख कामासंबधी बोलताना दिसतोय. फोनवर तो कोणाकडे काम मागतांना दिसतो आहे. मात्र, हे एका वेब सीरिजचं प्रमोशन असल्याचं बोललं जातंय.

शाहरूख ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेब सिरीजची निर्मिती करणार हे त्यानं यापूर्वीच जाहीर केले होते. त्याच सिरीजच्या प्रमोशनचे हे व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. रिभू दासगुप्ता या वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार असून इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परंतु, या वेब सीरिजमध्ये शाहरूख केवळ निर्मात्याच्या भूमिकेत राहणार की अभिनयदेखील करणार हे कोडं येत्या काही दिवसांत सुटणार हे मात्र नक्की आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like