Shahajibapu Patil On Chhagan Bhujbal | भुजबळांना घरचा आहेर, शिदे गटाच्या आमदाराने सुनावले, अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती

नागपूर : Shahajibapu Patil On Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळ हे ठिकठिकाणी सभा घेत सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यास विरोध करत आहेत. शिवाय, त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनाही वेळोवेळी लक्ष्य केले आहे. आता भुजबळ सभागृहात सुद्धा जरांगे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकुणच भुजबळांनी घेतलेल्या या भूमिकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोध केला आहे. (Shahajibapu Patil On Chhagan Bhujbal)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांना सुनावताना शहाजी बापू पाटील म्हणाले, मराठा आरक्षणामुळे ओबीसींनी घाबरण्याचे कारण नाही. तुमच्यावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण दिले तर त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या. अजून तुमच्यावर अन्यायच झालेला नाही. आपल्यावर अन्याय होणार आहे असे गृहीत धरून तुम्ही मेळावे का घेत आहात. छगन भुजबळ यांचे प्रतिमेळावे घेण्याचे धोरण चुकीचे वाटते. (Shahajibapu Patil On Chhagan Bhujbal)

शहाजी बापू पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मेळावे घेतले म्हणून छगन भुजबळांनी तसेच
मेळावे घेणे हे चुकीचे आहे. अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती. छगन भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि
कॅबिनेटमधील मंत्री आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी मंत्रिमंडळाचे व्यासपीठ उपलब्ध होते.
परंतु, त्यांनी समाजात जाऊन प्रतिमेळावे घेणे चुकीचे आहे.

शहाजी पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. या मागणीचा मी कडवा समर्थक आहे.
मराठा समाजातील तरुणांची आरक्षणासाठीची तीव्रता वाढत चालली आहे.
याचा उद्रेक होण्याअगोदर आरक्षणाचा निर्णय होणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर