पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘फर्जी’ (Farzi Web Series) या वेब सिरीजला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले असून या वेब सिरीज मध्ये शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा मुख्य भूमिकेत आहे. सध्या सर्वत्र या वेबसिरीचे कौतुक होताना दिसत आहे. या वेब सिरीज मध्ये शाहिद (Shahid Kapoor) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या अभिनयाची प्रशंसा देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या वेब सिरीज मध्ये खोट्या चलनी नोटा बनवणाऱ्या एक मोठ्या रॅकेट बद्दल आणि एकूणच या गुणाबद्दल गोष्ट फार उत्तमरीत्या दाखवण्यात आली आहे.
एवढेच नाही तर ही वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’ (‘The Family Man’) या वेब सिरीजशी जोडल्याने चाहते आता याच्या पुढच्या सीझनसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्रेक्षकांनी फर्जीच्या पहिल्या सीजनला भरभरून प्रेम दिले आहे. फर्जीने ओटीटी विश्वात एक वेगळाच विक्रम रचला आहे. शाहिद कपूरने (Shahid Kapoor) आपल्या सोशल मीडियावर फर्जी ही भारतात सर्वात जास्त पाहिली गेलेली वेब सिरीज ठरली आहे या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहे.
सध्या त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.
एवढेच नाही तर या वेब सिरीजने ‘मिर्झापूर’ (‘Mirzapur’) आणि ‘द फॅमिली मॅन’ सारख्या लोकप्रिय वेब सिरीजना मागे टाकले आहे.
या वेब सिरीज मध्ये शाहिद कपूर सोबत केके मेनन (KK Menon), विजय सेतुपती (Vijay Sethupathi),
राशी खन्ना (Rashi Khanna), अमोल पालेकर (Amol Palekar) या कलाकारांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.
सध्या प्रेक्षक या सिरीजच्या पुढच्या सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत.
नुकताच शाहिद कपूर ने या सिरीजच्या दुसऱ्या सीजनवर भाष्य केले होते.
यावेळी तो म्हणाला की “याचा दुसरा सिझन यायला बराच वेळ आहे पण पुढील सीजन येणार हे मात्र नक्की आहे.”
Web Title :- Shahid Kapoor | shahid kapoor vijay sethupati starrer farzi becomes the most watched webseries
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Dada Bhuse | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच दादा भुसेंचा इशारा, म्हणाले-‘जास्तीचं खोटं बोलले तर…’