शाहरुखच्या चाहत्यांसाठी ‘गुडन्यूज’ ; लवकरच दिसणार राजकुमार हिरानींच्या ‘चित्रपटात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवुडमधील शाहरुख खान हा रोमान्सचा बादशहा समजला जातो. बरेच दिवस झाले शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहिले नाही. लवकरच त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे, असं समजत आहे. शाहरुख लवकरच राजकुमार हिरानी यांच्या एका लव्ह स्टोरीमध्ये दिसणार आहेत.

जीरो चित्रपट फ्लोप गेल्यानंतर शाहरूख कोणत्याही चित्रपटात दिसला नव्हता. टेड टॉक्स २ मध्ये शाहरुखला पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद तर झालाच आहे. त्यानंतर आता शाहरूख राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलं जात आहे.

मिड डे ने दिलेल्या रिपोर्टनुसार राजकुमार हिरानी एक लव्ह स्टोरीवर फिल्म बनवत आहेत. त्यातील भूमिकेसाठी शाहरुख खान योग्य आहे. या चित्रपटाबाबत त्यांनी अद्याप काही सांगितले नाही. परंतु या दोघांना मागच्या महिन्यात अनेकदा एकत्र पाहिले आहे. त्यामुळे लवकरच एकत्र काम करताना दिसतील, असं सर्वांचे मत आहे.

दरम्यान, शाहरुखने काही दिवसांपूर्वी चायनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या पुढील चित्रपटाविषयी घोषणा करण्याबद्दल त्यांनी सांगितलं. तसंच या जून मध्ये शाहरुख आपल्या या चित्रपटाविषयी सांगू शकतो. त्यामुळे शाहरुख लवकर रोमान्स करताना दिसणार आहे.