Shambhuraj Desai On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना तुरुंगाबाहेरील वातावरण मानवत नाही; त्यांना पुन्हा आरामाची वेळ येऊ नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shambhuraj Desai On Sanjay Raut | सीमावादावरील प्रश्नांवरून संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. शिंदे आणि त्यांचे मंत्री बसवराज बोम्मई यांच्यापुढे शेपूट घालत आहेत, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी तोंड आवरावे, संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्ये थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai On Sanjay Raut) म्हणाले.

 

देसाई म्हणाले, आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून तुरुंगाबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरील वातावरण तुम्हाला मानवत नाही असे दिसत आहे. म्हणूनच तुम्ही अशी वक्तव्ये करत आहात. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्ये करणे टाळा. शंभूराज देसाई यांनी एकप्रकारे संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात पाठवू, असा धमकीवजा इशाराचा दिला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढत आहोत. पण उगाच या वादाचा राजकीय फायदा घेतला जात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत षंड म्हणाले आहेत. त्यांचा मी धिक्कार करतो. समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असे असताना राऊतांनी षंड शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतः लढ्यात उतरावे आणि मग मुख्यमंत्र्यांना बोलावे. (Shambhuraj Desai On Sanjay Raut)

कर्नाटक न्याय व्यवस्थेकडून राऊतांना आमंत्रण आले होते. पण, ते गेले नाहीत.
न्यायालयाचे कवचकुंडल असतानादेखील तुम्ही जाऊ शकला नाहीत.
त्यामुळे तुम्हाला कर्नाटक सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापेक्षा राऊतांना शरद पवारांचे नेतृत्व अधिक प्रिय वाटते.
उद्धव ठाकरे यांनी मागील अडीच वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला आपला पक्ष बांधला आहे,
असे म्हणत देसाई यांनी उद्धव ठाकरेंवरपण हल्ला चढवला.

 

Web Title :- Shambhuraj Desai On Sanjay Raut | sanjay raut should keep his mouth shut otherwise shinde group leader shambhuraje desai targets raut maharashtra politics news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी