Shamita Shetty | अभिनेत्री शमिता शेट्टीने करिअर बाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : Shamita Shetty | बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आजवर मनोरंजन विश्वात अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. शिल्पा शेट्टीचे चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण झाल्यानंतर काही वर्षांनी तिची बहीण शमिता शेट्टी हिने देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र तिला शिल्पा एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. आता एका मुलाखतीत शमीताने यावर मोकळेपणाने आपले वक्तव्य केले आहे. (Shamita Shetty)

शमिताने सिनेसृष्टीत ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही शमितालाच मिळाला होता. यानंतर ती काही चित्रपटांमध्ये देखील झळकली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मध्यंतरी बिग बॉस मध्ये ती झळकली होती. तेव्हा देखील ती चित्रपटसृष्टी पासून लांब असल्याने मोठी चर्चा निर्माण झाली होती. तर आता शमिताने तिच्या या मोठ्या पडद्यापासून दूर असण्याचे कारण सांगितले आहे. (Shamita Shetty)

मुलाखतीमध्ये शमिता म्हणाली, “यशराज फिल्मच्या माध्यमातून मी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र त्यानंतर मला अपेक्षित असे काम मिळाले नाही. मोहब्बतेच्या वेळी मला अभिनय करायला किती आवडायचे हे मला कळाले नव्हते. मात्र ‘जहर’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला माझ्यातील अभिनयाची आवड कळाली. त्यानंतर मी कामाच्या बाबतीत थोडीशी हवरट झाले. मी आणखीन काम करू इच्छित होते. पण इंडस्ट्रीत माझ्यासाठी कोणतेच काम नव्हते. मला हव्या होत्या तशा गोष्टीच नव्हत्या. माझे चित्रपट 3 ते 4 वर्षाच्या अंतर ठेवून येतात दरवेळी चित्रपटात आल्यानंतर प्रेक्षक असे म्हणतात की तुझं पुनरागमन आहे. परंतु मी जास्तीत जास्त काम करू इच्छित होते. शमिता 2007 मध्ये कॅश या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली. त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी ती मोठ्या पडद्यावर ‘द टेनंट’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title :- Shamita Shetty | shamita-shetty-shared-her-career-journey-in-an-interview