Shane Warne-Gina Stewart | ‘शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी आम्ही रिलेशन…’, 51 वर्षाच्या मॉडलच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shane Warne-Gina Stewart | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर दिवंगत शेन वॉर्नची चाहत्यांना उणीव भासत आहे. शेन वॉर्नची गणना जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये केली जाते, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानाबाहेरही प्रसिद्धी मिळवली आहे. यावर्षी मार्चमध्ये थायलंडमध्ये त्यांचे निधन झाले. पण शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी एका महिलेने त्यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. (Shane Warne-Gina Stewart)

 

’वर्ल्ड्स हॉटेस्ट ग्रँडमा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या Gina Stewart ने दावा केला आहे की शेन वॉर्न त्यांच्या मृत्यूपूर्वी काही काळ तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. शेन वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूमुळे ती पूर्णपणे खचली असल्याचे जीना स्टीवर्ट म्हणाली.

 

 

डेलीस्टारला दिलेल्या मुलाखतीत, 51 वर्षीय Gina Stewart ने शेन वॉर्नसोबतच्या तिच्या कथित नात्याबद्दल सांगितले. तिने सांगितले की, जुलै 2018 मध्ये दोघांचे ऑनलाइन संभाषण झाले, दोघेही अनेक महिने ऑनलाइन बोलले आणि नंतर भेटले. गेल्या काही महिन्यांत जग पूर्णपणे बदलले आहे, जगाने एक दिग्गज गमावला आहे आणि मी माझा खास मित्र गमावला आहे, असे जीना स्टीवर्ट म्हणते. (Shane Warne-Gina Stewart)

 

इंस्टाग्रामवरील संभाषण समोर आले

Gina Stewart ने दावा केला की मी शेन वॉर्नला डेट करत होते, परंतु त्याला ते वैयक्तिक ठेवायचे होते. मॉडेल जीनाने मुलाखत घेणार्‍या वेबसाइटला शेन वॉर्नसोबतचे इंस्टाग्रामवरील चॅटींगसुद्धा दाखवले आहे. जीना स्टीवर्टने सांगितले की, तिची आणि शेन वॉर्नची पहिली भेट क्रिकेटच्या खेळानंतर झाली, त्यानंतर आम्ही रात्रभर बोललो.

मुलाखतीत मॉडेलने दावा केला आहे की शेन वॉर्न आणि तिचे फोटो काढण्यासाठी अनेक फोटोग्राफर्स त्रास देत असत, पण वॉर्नला हे सर्व आवडत नव्हते. त्यामुळे आम्ही फक्त कॅप आणि चष्मा घालूनच बाहेर पडायचो. जीना स्टीवर्ट म्हणते की मी आता हे सांगत आहे कारण मला त्याला श्रद्धांजली द्यायची आहे.

 

 

कोण आहे जीना स्टीवर्ट ?

Gina Stewart एक ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आहे. 51 वर्षीय जीना स्टीवर्ट 4 मुलांची आई आहे,
परंतु सध्या ती कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नाही.
जीना स्टीवर्टला ऑस्ट्रेलियन मासिकाने वर्ल्ड हॉटेस्ट ग्रँडमदरचा किताब दिला होता, त्यानंतर ती चर्चेत राहिली.
ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे, तसेच इंस्टाग्राम – टिकटॉकवरही ती खूप प्रसिद्ध आहे.

 

कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू ?

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (52) यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले. शेन वॉर्न त्यांच्या मित्रांसह थायलंडला भेट देण्यासाठी गेले होते, तिथे ते एका खाजगी व्हिलामध्ये राहिले होते.
जेव्हा शेन वॉर्न त्यांच्या खोलीत होते तेव्हा ते संशयास्पद स्थितीत मृत आढळले.
मात्र, त्यानंतरच्या पोलिस तपासात त्यांच्या मृत्यूमध्ये काहीही गैर आढळून आले नाही.

शेन वॉर्न यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 145 कसोटी सामने खेळले आणि 708 बळी घेतले, तर 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 बळी घेतले.
शेन वॉर्न यांनी आयपीएलमध्ये 55 सामने खेळून 57 विकेट्स घेतल्या आहेत.

 

Web Title : – Shane Warne-Gina Stewart | shane warne relationship before death model gina stewart world hottest grandma australia cricketer

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा