Shane Warne Net Worth | Ferrari, Lamborghini सारख्या महागड्या कारने भरलेले आहे Shane Warne यांचे गॅरेज, एकुण संपत्ती ऐकून वाटेल आश्चर्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shane Warne Net Worth | आपल्या फिरकीने जगभरातील फलंदाजांना त्रस्त करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन (Shane Warne Death News) झाले. ते 52 वर्षांचे होते. संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने (Shane Warne Death Reason) थायलंडमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या ऑस्ट्रेलियन लेगस्पिनरच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला आहे. (Shane Warne Net Worth)

 

सोशल मीडियावर लोक आपल्या आवडत्या क्रिकेटरबद्दल पोस्ट लिहित आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, वॉर्नची जीवनशैली किती शानदार होती आणि त्याची नेटवर्थ किती आहे.

 

वेगाची आवड (Shane Warne Love for Cars)

वॉर्न यांचा सर्वकालीन महान स्पीनर्समध्ये समावेश होतो. त्यांना वेगाची आवड होती. वॉर्नला फेरारी (Ferrari) आणि लॅम्बोर्गिनी (Lamborghini) सारख्या कार खूप आवडत होत्या. त्यांनी एकदा सांगितले होते की त्यांच्याकडे 20 कारचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये दोन सीटर F Type Jaguar कारही आहे.

 

वॉर्न यांच्या गॅरेजमध्ये या गाड्याही आहेत

मीडिया रिपोर्टनुसार, वॉर्न यांनी कोट्यवधी रुपयांची Bentley Continental Supersports कार खरेदी केली होती. त्यांच्याकडे Bugatti Veyron सारख्या आलिशान कार होत्या. वॉर्न यांच्या वडिलांनाही गाड्यांची खूप आवड होती. वॉर्न यांच्या गाड्यांच्या ताफ्यात दोन मर्सिडीज, दोन BMW आणि Holden VK Commodore यांचाही समावेश होता.

 

शेन वॉर्न नेटवर्थ
हा ऑस्ट्रेलियन फिरकीपटू जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. विविध मीडिया रिपोर्ट आणि Celebritynetworth.com नुसार, वॉर्न यांची एकूण संपत्ती सुमारे 50 मिलियन डॉलर (सुमारे 385 कोटी रुपये) आहे.

 

वॉर्न यांच्या नावावर हे विक्रम
ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज क्रिकेटपटू वॉर्नने कसोटी कारकिर्दीत 145 सामने खेळले.
त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या.
कसोटी क्रिकेटमधील विकेट्सच्या बाबतीत तो श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (800) नंतर दुसर्‍या क्रमांकावर होते.
वॉर्न यांनी जानेवारी 2007 मध्ये शेवटची कसोटी खेळली.

 

Web Title :- Shane Warne Net Worth | shane warne net worth and car collection includes ferrari and lamborghini

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा