Pune Police News | सराईत गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणारे व्हाईट कॉलरवाले पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर

गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडकेसह 11 नामचीन अन् 23 उदयास येणार्‍या टोळयांच्या प्रमुखासंसह 267 गुन्हेगारांची आयुक्तालयात ‘परेड’

पुणे : नितीन पाटील – Pune CP Amitesh Kumar | पुणे शहरातील सराईत आणि संघटित गुन्हेगारी टोळीतील सक्रिय सदस्यांना आर्थिक रसद पुरवणारे आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (मंगळवार) शहरातील गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडकेसह 11 नामचीन टोळयांसह नव्याने उदयास येणार्‍या 21 टोळीच्या प्रमुखांची आणि त्यांच्या बगल बच्यांची आयुक्तालयात परेड भरवली होती.

त्याला तब्बल 267 गुन्हेगार हजर होते. यावेळी पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरून घेतला असून त्यामध्ये 8 प्रमुख मुद्यांचा समावेश आहे. त्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍यांची माहिती देखील पुणे पोलिसांनी त्यांच्या फॉर्ममध्ये भरून घेतली असून आगामी काळांमध्ये ते पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. (Pune Police News)

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवकर यांनी कुख्यात गजानन मारणे (२० सदस्य), बंटी पवार (०८), नीलेश घायवळ (०९), गणेश मारणे (१९), टिपू पठाण (०९), बंडू आंदेकर (१३), उमेश चव्हाण (१०), बाबा बोडके (२९), अन्वर ऊर्फ नव्वा (०६), बापू नायर (०९), खडा वसीम (०८) या प्रमुख ११ टोळ्यांसह सुमित चौधरी (०६), मामा कानकाटे (०५), योगेश लोंढे (०२), जंगल्या पायाळ (०२), सनी टाक (०३), सनी हिवाळे (०३), गणेश लोंढे (०३), जीवन कांबळे (०१), किरण थोरात (०५), सौरभ शिंदे (०१), कुणाल कालेकर (०१), आकाश भातकर (०३), आप्पा घाडगे (०१), अनिकेत साठे (०२), रोहित भुतडा (०६), विद्या पाडाळे (०५), अनिकेत जाधव (०२) अशा ‘रायजिंग गॅंग’च्या म्होरक्यांसह एकूण २६७ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक राजनीश निर्मल, अजय वाघमारे, भरत जाधव, नंदकूमार बीडवई, श्रीहरी बहिरट, सोमनाथ जाधव, विष्णू ताम्हाणे, उल्हास कदम, क्रांतीकुमार पाटील, प्रताप मानकर, राजेंद्र लांडगे, अनीता हिवरकर, विनायक गायकवाड यांनी सहभाग घेतला.

गुन्हेगारांकडून भरून घेण्यात आलेल्या फॉर्ममध्ये प्रामुख्याने 8 मुद्यांचा समावेश असून त्यामध्ये त्यांची वैयक्ति माहिती, ते कुठल्याही टोळीशी संलग्न आहेत, त्यांचा वकील कोण, डॉक्टर कोण, यापुर्वी किती गुन्हे दाखल आहेत, ते कुठल्या जेलमध्ये होते, त्यांच्याकडून आतापर्यंत काय-काय रिकव्हर करण्यात आले, त्यांचे राजकीय संबंध तसेच त्यांना अर्थिक रसद पुरविणार्‍यांच्या (असतील तर) माहितीचा समावेश आहे.

गुन्हेगारांकडून भरून घेण्यात आलेल्या फॉर्मचे संपुर्णपणे डिझीटलाझेशन होणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त

आगामी काळात गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. सोशल मिडीयावर रिल्स टाकणार्‍या तसेच स्टेटसला वेगवेगळे फोटो अन् रिल्स ठेवणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर पुणे पोलिसांची बारीक नजर असणार आहे.

गुन्हेगारी मुक्त समाज यावर आम्ही काम करणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पुणे शहरात अवैध धंदे कुठल्याही परिस्थिती सुरू राहणार नाहीत हे पुन्हा एकादा पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलिस कर्मचार्‍यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न