Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचा टोला

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री (Chief Minister) होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टोला लगावला आहे. शरद पवार गुरुवारी (दि.12) अकोला दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना इंडिया आघाडीत (India Alliance) घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले होते. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही.

अजित पवार यांची घरवापसी शक्य आहे का? या प्रश्नावर शरद पवारांनी नाही असे म्हटले आहे. माझी आजही तीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर त्याचे स्वागतच आहे. भाजपचे (BJP) सरकार नको अशी जनतेची भावना असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) आरोपांवर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, आमच्यातील काही
लोकांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता.
पण त्यांनी स्वीकारला नाही. त्यापुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती.
आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे पवार म्हणाले.

51 टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकू असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
(Chandrasekhar Bawankule) यांनी केले होते. यावर विचारले असता बावनकुळेंना आमच्या शुभेच्छा आहेत.
त्यांना स्वत:ला पक्षाने संधीदेखील दिली नाही, त्या माणसाला काय महत्त्व द्यायचे, असे म्हणत शरद पवारांनी
टोला लगावला. देशात कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शाळाही दत्तक देऊ लागल्याने खासगी लोक त्याचा
गैरवापर करतील अशी भीती शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जिओ कस्टमर केअर मधून बोलतोय! पुण्यातील तरुणीला 5 लाखांचा गंडा

Chitra Wagh On Supriya Sule | राज्याच्या मोठ्ठ्या ताई…तुमची चॉईसच वेगळी, महाराष्ट्र तरी काय करणार?, चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका (व्हिडिओ)