लवकरच ‘कंठ’ फुटला, शरद पवारांचा फडणवीसांवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झारखंडच्या विधानसभा निकालामुळे भाजपला डबल धक्का बसला आहे. झारखंडमध्ये सत्ता गेलीच शिवाय जागाही घटल्या आहेत. झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. झारखंडमधल्या आदीवासी जनतेनं जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे. ही जनतेची भाजप विषयची नापसंती आहे. भाजपचा देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रकार सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात एनसीआरचा विषय मंत्रिमंडळात मांडला नाही, पण अमित शहांनी राज्यसभेत एनसीआरचा विषय मांडला. त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळतंय. सरकारला सर्व विषयांवर अपयश आल्याने ते अपयश झाकण्यासाठी सीएए आणि एनआरसी असे विषय काढले जात आहेत. देशात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोपही शरद पवारांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका करणाऱ्या फडणवीसांवरही त्यांनी सडकून टीका केली.

शरद पवार म्हणाले, भाजपला उतरती कळा लागली असून ती आता कुणीही थांबवू शकत नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला हरवणे अवघड नाही. आम्ही मंत्रिमंडळ कधी तयार होते याची वाट पाहात आहोत, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तर विरोधी पक्ष नेत्याला लवकर कंठ फुटला, जरा वाट बघा, अगदी पंधरा दिवसात या सरकारने धाडसी निर्णय घेतले असे शरद पवार यांनी मत व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/