Sharad Pawar | ‘भाजपला राज्यात येऊ देणार नाही, मात्र…’; युवा आमदारांना शरद पवारांचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राज्यातील राजकीय वातावरण पाहता विरोधक सत्ताधाऱ्यांवर काहीना काही आरोप करत आहेत. अधिवेशनात तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह सादर करत सरकारला मोठे धक्के दिले. सध्या सुरू असलेल्या वादळी अधिवेशनाला महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) अनेक आमदार उपस्थित आहेत. अशातच तिन्ही सरकारमधील युवा आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

 

सिल्वर ओकवर (Silver Oak) जवळपास दोन तास बैठक चालू होती. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. युवा आमदारांना (Young MLA) शरद पवारांनी मार्गदर्शन करताना काही कानमंत्रही दिले. ज्यावेळी बैठक संपली तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे दोन्ही हात वर केले आणि वज्रमूठ तयार करत घाबरण्याचं काही कारण नाही, मी भाजपला (BJP) पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा आत्मविश्वासही (Confidence) शरद पवारांनी व्यक्त केला.

 

आपले राजकीय विरोधक असतात त्यांच्या सर्वच गोष्टी नकारात्मक नसतात. भाजप आपला विरोधक आहे त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. दिवस – रात्र मेहनत घ्यायची आणि व्यूहरचना आखून निवडणूक लढण्याची तयारी हे शिकावं, असा कानमंत्रही पवारांनी आमदारांना दिला.

दरम्यान, येत्या काही दिवसातच आम्ही राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
त्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक संस्था संघटना स्थापन करा, त्यांच्या कामकाजात रूची घ्या, असा सल्लाही शरद पवारांनी तरूण आमदारांना सांगितला.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar), आदिती तटकरे (Aditi Tatkare), आशुतोष काळे (Ashutosh Kale),
धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh), अतुल बेनके (Atul Benke), योगेश कदम (Yogesh Kadam),
इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी पवारांची आज भेट घेतली.

 

 

Web Title :- Sharad Pawar | mahavikas aghadi mlas meet ncp president sharad pawar what exactly happened

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा