शरद पवार यांनी घेतली मायावतींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

केंद्रात भाजप विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याच्या हालचाली सुरु झाल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेतली. मायावती यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
[amazon_link asins=’B01J22KFRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69b7e522-909b-11e8-8c87-31d6679ffc16′]

शरद पवार आणि मायावती यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा रंगली. भाजपविरोधी पक्षांची एकजुट आणि देशात सध्या असलेले वातावरणावर प्रामुख्याने चर्चा झाली. संभाव्या पंतप्रधानांच्या उमदेवारीवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. मायावती यांच्या बरोबर सतीशचंद्र मिश्रा यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली. शरद पवार यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली.