Sharad Pawar | एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन –  Sharad Pawar | एसटी महामंडळाचे (MSTRC) सरकारी सेवेत समावेश करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगारांचा मागील काही दिवसांपासून राज्यव्यापी संप (ST workers strike) सुरु आहे. दरम्यान, आज संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात महत्त्वाची बैठक सुरुय. संप कसा मिटणार याकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) एसटी विलीनीकरणाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

 

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ‘राज्यात एसटीची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. एसटीच्या संपावर (ST workers strike) मी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केलीय.
एसटी कधी राज्य सरकारचा आधार घ्यावा लागला नाही. इतक्या वर्षात कधीच राज्य सरकारचा आधार घेतला नाही.
एसटीबाबत सामान्य माणसाचं मतही महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
तर, एसटीचं विलीनकरण केल्यास बाकीच्या महामंडळाचंही विलीनीकरण करावं लागेल. शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय अन्य आरोग्य खात्यातील कर्मचारी, आशा वर्कर्स आहेत.
एका विलीनीकरणाचं सूत्र अवलंबलं तर ते सर्वांना लागू होईल, असा मुद्दा पवार (Sharad Pawar) यांनी मांडला.
विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात, त्यावर आता बोलणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘1948 साली एसटीला सुरुवात झाली, तेव्हापासून गेली 2 वर्ष सोडली तर कधीही एसटीला राज्य सरकारचा आधार घ्यावा लागला नाही.
स्वत:च्या ताकदीवर एसटी आपला अर्थव्यवाह सांभाळत आलीय. पण अलिकडच्या काळात राज्य सरकारने 500 कोटी रुपये वेतनवाढ करण्यासाठी एसटीला दिले.
एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर आम्ही चर्चा केली आहे.

दरम्यान, एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर चर्चा झाली. 5 राज्यांचं वेतन तपासलं, गुजरातचं वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.
बाकीच्या म्हणजे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.
वेतनाचा फरक आहे तो भरुन काढा, इतर राज्यांचं वेतन पाहून त्यावर मी पर्याय सांगितल्याचं पवार म्हणाले.

 

Web Title :  Sharad Pawar | ncp chief sharad pawar big statement over maharashtra st workers strike msrtc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Demi Rose | डेमी रोजनं केलं चक्क टॉपलेस फोटोशूट, फोटो व्हायरल

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी