Sharad Pawar On Baramati Lok Sabha | बारामती बाबत विजयाची खात्री दर्शवताना पवारांची साशंकता; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बारामती: Sharad Pawar On Baramati Lok Sabha | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) अशी लढत पाहायला मिळाली.

या निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचला होता. आरोप – प्रत्यारोप आणि भावनिकतेच्या जोरावर हा प्रचार चांगलाच रंगला होता. आता या लढतीत बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एका मुलाखतीत बोलताना पवार म्हणाले की ” बारामतीत विजयाची खात्री असायला काहीच हरकत नाही.
मात्र इथे पैशाचा वापर कधीच झाला नव्हता, पण या निवडणुकीत पैशाचा अमाप वापर झाला असे लोक सांगत आहेत.
आता त्याचा परिणाम किती होईल याबाबत आज सांगता येणार नाही “असे वक्तव्य पवारांनी केले. (Sharad Pawar On Baramati Lok Sabha)

विजयाची खात्री दर्शवताना शरद पवारांनी साशंकता निर्माण करणारे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तास्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही
तसेच उद्धव ठाकरे देखील भाजप सोबत जाणार नसल्याचे पवारांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त