Sharad Pawar On Narendra Modi | साताऱ्यातून शरद पवारांची गर्जना, ”नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं देशाची गरज”

सातारा : पुरोगामी विचारांना सातारची जनता नेहमीच पाठिंबा देते. श्रीनिवास पाटील यांनाही सातारकरांनी निवडून दिले. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी (India Alliance) काम करत आहे. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणे ही देशाची गरज आहे, अशी गर्जना आज ज्येष्ठे नेते शरद पवार (Sharad Pawar On Narendra Modi) यांनी साताऱ्यातून (Satara Loksabha Election 2024) केली.

सातारा येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासारखे दुसरे काही नाही. शशिकांत शिंदेंना लोकांचा प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांच्यावर आरोप लावले जातेय. आपलं नाणं खणखणीत आहे. लोकांमध्ये शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आपुलकी आहे.(Sharad Pawar On Narendra Modi)

शरद पवार पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झाली.
त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांवर आहे. हजारोंच्या संख्येने लोक आज शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले.
देशातील लोकांना परिवर्तन हवे आहे. त्याचे पहिले पाऊल साताऱ्यातून टाकले आहे.
आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सातारकरांनी केले.

शरद पवार म्हणाले, देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. मागील १० वर्ष त्यांच्याकडे राज्य आहे आणि हिशोब मला मागतात.
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मी काय काम केले त्याचे उत्तर देऊ शकतो.
इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांना पाठिंबा आहे, असे पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला

BJP MLA Mangesh Chavan | भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, ”मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा…”, फडणवीसांचाही उल्लेख

Pune News | केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च