Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकार कोसळून राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे शिंदे सरकार कोसळणार का?, याची सर्वांना उत्सुक्ता लागली आहे. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. (Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt)

 

त्यामुळे शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यातून एकनाथ शिंदे यांना टोला लावला आहे. एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आपला नियोजित कार्यक्रम बदलला आणि सिन्नरला गेले. येथे त्यांनी ज्योतिषाला हात दाखवत आपले भविष्य पाहिले आणि राज्यातील सरकारचे देखील भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर टीका करत आहे. शरद पवार यांनी देखील त्यांचा खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात हा प्रकार नवीन आहे. पूर्वी असे काही होत नव्हते. मी ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. तसेच माझा त्यावर विश्वास देखील नाही. मी माझे दौरे सोडून कुठेही हात दाखवायला जात नाही.

आसाममध्ये काय घडले, हे सर्वांना माहीत आहे. आता पुन्हा एकदा आसामची सहल होणार आहे. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम सोडून शिर्डीला जाणे आणि कोणाला तरी हात दाखवून भविष्य पाहणे आमच्यासाठी नवीन आहे. पुरागामी विचारांचे राज्य म्हणून लौकीक असलेल्या महाराष्ट्रात या नवीनच गोष्टी पहायला मिळत आहेत. जनता या गोष्टींचा स्वीकार करत नाही, हे दाखवून देईल, असे शरद पवारांनी (Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt) सांगितले.

 

शरद पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर देखील भाष्य केले.
राज्यपालांच्या विषयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी लक्ष घालावे.
महाराष्ट्रातील राष्ट्र पुरुषांचा सतत अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल पदाच्या जबाबदाऱ्या देऊ नयेत,
असे पवार यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | Will the Shinde-Fadnavis government collapse? Sharad Pawar replied; Said – ‘I am not an astrologer’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

Mahavitaran Employee – Court News | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस 3 वर्षे सश्रम कारावास