Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीचा एका दिवसात जामीन झाला. त्यावरून राजकीय वर्तुळातून अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले. (Kalyani Nagar Accident)

समाजमाध्यमातूनही याबाबत रोष व्यक्त केला जाऊ लागला. या प्रकरणाबाबत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar MLA) , काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांसह इतर नेत्यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली . उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आयुक्तालयाला भेट देत पोलिसांना सूचना केल्या.(Sharad Pawar – Porsche Car Accident Pune)

या सर्वांमध्ये पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कुठे दिसले नाहीत. यावरून विरोधकांनी पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवालही उपस्थित केला. याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले असता शरद पवारांच्या चेहऱ्यावरील भाव बदलल्याचे दिसले.

“पुण्यात एक हिट अँड रनचे प्रकरण घडले आहे (Pune Hit And Run Case) . पुण्याचे पालकमंत्री अजित पवार
याबाबत कुठेही भाष्य करताना दिसत नाहीत शिवाय अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत?”
असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ” हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे.
तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. आता तुम्ही एखाद्या वकिलांचा संबंध तुम्ही याच्याशी जोडणार आहात.
कोणीतरी चार ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे, असं मला वाटतं नाही. प्रत्येक ठिकाणी मीच भाष्य केलं पाहिजे
याची काही आवश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबतची जबाबदारी पाळली आहे.
आता या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याची गरज नाही.” असे पवारांनी यावेळी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी