Sharad Pawar | अजित पवारांसोबतच्या पुण्यातील भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar | आज पुण्यात अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) आपसातील भेटींवर सकाळपासून चर्चा सुरू आहे. आज सकाळी अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर पवार कुटुंबियांच्या एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार हे पुण्यातील बाणेर येथे एकत्र आले होते. यावरून चर्चांना उधाण आले असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट झाली. दिवाळी सणाच्या निमित्ताने स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब एकत्र आल्याचे समजते.

ADV

शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना प्रथम राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
ही दिवाळी सर्वांना सुखाची, आनंदाची जावो असे ते म्हणाले. अजित पावर आणि प्रतिभाताई पवार यांच्या तब्बेतीबद्दल
शरद पवार म्हणाले, सगळ्यांची तब्बेत चांगली आहे. तर, ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असे शरद पवारांच्या बहीण
सरोज पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाल्यानंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
दिल्लीत ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रस (NCP) शरद पवार गटाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा आहे.
त्याबद्दल मी काय बोलणार? मी पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला.
कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी काय बोलू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील सहवर्धन समूहाने सियाचीनमधील जवानांसाठी पाठवल्या ५०० गरम टोप्या, देशसेवेचा अनोखा उपक्रम

Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

Samvidhan Samman Daud In Pune | भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन

Chandrakant Patil Visit Bajirao Peshwa Statue | बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी – चंद्रकांत पाटील