NCP Chief Sharad Pawar | ‘…तर महाराष्ट्राच्या मागे भक्कमपणे उभी राहणारी केंद्रातील व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी’ – शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 (Sugar Council 2022) चे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी शरद पवार यांनी मंत्री गडकरींची स्तुती केली आहे. ‘सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभे असल्याचं,’ सांगितलं आहे.

 

“साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची (State Government) मदत हवीच असते. सुदैवाने आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असणारे अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचीही मदत होईल. आज केंद्र सरकारमध्ये (Central Government) महाराष्ट्रातील ऊसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहेत याचा मला मनापासून आनंद असल्याचं,” शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर उद्योगात यश मिळवलं आहे. साखर उद्योगात महाराष्ट्र आता एक नंबर आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा मला आनंद आहे, पण आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अडचणीतून मार्ग काढणं गरजेचं आहे. तर, मागील 2 वर्षात पाऊस चांगला होता. ऊस क्षेत्र वाढले, हंगाम चांगला झाला. अजून ऊस क्षेत्र येणाऱ्या काळात वाढणार आहे. हवामान अंदाजानुसार पाऊस चांगला होणार आहे. त्यामुळे आता ऊस क्षेत्र वाढणार आहे आणि त्यासाठी ऊस तोड नियोजन करायला लागणार आहे. ऊस तोडणी वाहतूक प्रश्न गंभीर असल्याचं,” ते म्हणाले.

 

“भारतातील साखर जगातील 121 देशांत पोहचली आहे. असं कधी झालं नव्हते. अफगाणिस्तान साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तिथली परिस्थिती बदलली आहे. साखर निर्यात चांगली झाली. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. मागील 3 हंगामात कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिलं आहे.” असं शरद पवार यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar praise nitin gadkari for helping to resolve maharashtra related issue in centre

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा