आबाच्या कन्येच्या लग्नाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी उद्या पुण्यातील हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यास शरद पवार हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. काल पुण्यात झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवार चालत असताना त्यांच्या बोटाला दुखापत झाल्याने त्यांना डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून पुढील पंधरा दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्याचा होणाऱ्या विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित घडामोडी:
‘मेहंदी तेरे नाम की ; आबांची कन्या स्मिताने रंगवली ‘आनंद’ च्या नावाची मेहंदी