Sharad Ponkshe | “एक मान कापल्यावर…”; शरद पोंक्षे यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्याच पद्धतीने देशात घडणाऱ्या घडामोडींवर ही ते नेहमीच भाष्य करत असतात. चांगलेच रंगलेले टिकली प्रकरण असेल की आता चालू असलेला वीर सावरकरांचे प्रकरण असेल शरद पोंक्षे हे नेहमीच त्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त करत असतात. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) यात्रेदरम्यान वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या मुद्द्याने सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावर शरद पोंक्षेनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच Viral होत आहे.

 

शरद पोंक्षेनी (Sharad Ponkshe) शेअर केलेल्या व्हिडिओत ते म्हणतात, “एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा, पण सावरकर म्हणतात की एक मान कापल्यावर पुढे करायला मानच राहत नाही हो म्हणूनच आपली मान कापायच्या आधीच आपण त्याची मान कापायला हवी याला म्हणतात धर्म”.

 

 

सध्या शरद पोंक्षेंचा (Sharad Ponkshe) हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
एखाद्या व्यक्तीने आपल्या गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा हे नेहमीच महात्मा गांधी सांगायचे.
महात्मा गांधी हे आपल्या भाषणामधून कायमच अहिंसेचे महत्त्व पटवून द्यायचे.
पण शरद पोंक्षनी मात्र महात्मा गांधींचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्याच संदर्भाने सावरकरांचे विचार त्यांच्या व्हिडिओतून सांगितले आहेत.

 

Web Title :- Sharad Ponkshe | marathi actor sharad ponkshe talking about religon and savarkar ideology

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना