Sharad pawar : सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने शरद पवार अडकले

सातारा: पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे साताऱ्यात पत्रकार परिषद झाल्यावर बाहेर पडताना.त्या सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने शरद यांना तब्बल १० मिनिटे आतमध्ये अडकून राहावे लागले.तर याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगल्याचे पाहावयास मिळाले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे साताऱ्यात आले होते.त्यावेळी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता.पत्रकार परिषद झाल्यावर शरद पवार हे सभागृहाच्या दरवाजा जवळ आल्यावर दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आले.त्यामुळे कार्यकर्त्यासह सर्वाची एकच धावपळ उडाली.तर या दरवाजाच्या समोर शरद पवार तब्बल १० मिनिट थांबल्यावर दरवाजा अखेर उघडला.

संबंधित घडामोडी:
कर्नाटकमध्ये काँग्रेसच येणार : शरद पवार
मुंडेंनी कोणताही हट्ट धरला नव्हता : शरद पवार