संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजार ‘गडगडला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारचे पहिलेच लोकसभा अधिवेशन सुरु झाले आहे. त्याचबरोबर आज शेअर बाजार जवळपास ५०० अंकानी कोसळला आहे.

देशांतर्गत आणि जागतिक कारणांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार अंकांनी कोसळला. सलग चार सत्रांमध्ये शेअर बाजारात घसरण सुरु आहे.आज शेअर बाजारात सेन्सेक्स ४९१. २८ अंकांनी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ४९१ अंकांनी कोसळून ३८,९६०. ७९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीनेही ११६७२. १५ पातळी गाठली.

या कारणामुळे शेअर बाजार कोसळला –

कमकुवत जागतिक धोरणे, अनिश्चितता तसेच पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत. मान्सूनला होणारा विलंबही शेअर बाजार कोसळण्यामागचे मुख्य कारण आहे.

आरोग्यविषयक वृत्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

#YogaDay2019 : ‘या’ आसनाने स्वभावात होतात सकारात्मक बदल

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता