शरजील इमामचा ‘कबुल’नामा, म्हणाला – ‘जोशात बोललो होतो आसामला देशापासून वेगळं करायचं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशद्रोहाच्या आरोपाखाली ताब्यात असलेला जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम बाबत आता काही खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत शरजीलने मान्य केले की त्याने अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमध्ये भडकावू भाषण देणारा व्हिडिओ त्याचाच आहे आणि व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नाही.

शरजील म्हणाला की व्हायरल झालेला व्हिडिओ पूर्ण नाही. त्याने जवळपास 1 तास भाषण केले होते. भाषणादरम्यान जोशात येऊन त्याने आसाम देशापासून वेगळा केला गेला पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्याची चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखा आणि स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की शरजीलने विचारपूर्वक पूर्वनियोजन करुन भाषण दिले होते.

एफआयआर दाखल होताच अंडरग्राउंड झाला –
चौकशीत शरजील इमामने सांगितले की तो 25 जानेवारीला बिहारच्या फुलवारी शरीफमध्ये सीएए-एनआरसीच्या विरोधात भाषण देण्यासाठी शाहीन बाग प्रमाणे सुरु असलेल्या धरणे आंदोलनात भाषण देण्यासाठी गेला होता. जेव्हा भाषण देत होता तेव्हा त्याला कळाले की त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. यानंतर तो अंडरग्राऊंड झाला.

गुन्हे शाखेच्या वृत्तानुसार शरजीलने फुलवारी शरीफ मध्ये आपला फोन बंद केला आणि थेट आपल्या गावी काकोमध्ये पोहचला आणि तेथून त्याला 25 जानेवारीला ताब्यात घेण्यात आले. शरजीलच्या कुटूंबाचा काकोमध्ये दबदबा आहे. त्यामुळे तो गावात लपण्यासाठी तेथे गेला.

इमामवाडामधून बाहेर येताच अटक –
दिल्ली पोलिसांच्या मते शरजीर काको गावाच्या इमामवाडामध्ये लपला होता. आत जाऊन त्याला ताब्यात घेणे अवघड होते. त्यामुळे तो बाहेर येण्याची वाट पाहिली गेली. यासाठी शरजीलला ओळखणाऱ्या काही लोकांची मदत घेण्यात आली. तो जसा इमामवाड्याच्या बाहेर पडला तसे दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या दरम्यान शरजील इमामला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. यापूर्वी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम इमामला घेऊन साकेत न्यायालयात पोहचली आणि न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. डीसीपी राजेश देव यांच्या मते शरजीलला 5 दिवसांची कोठडी मागितली होती.

इतर राज्यांच्या पोलिसांकडून देखील होऊ शकते चौकशी –
बिहारच्या जहानाबादमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या शरजील इमामाला बुधवारी पटनातून दिल्लीत आणण्यात आले. यापूर्वी अटकेआधी मंगळवारी दिल्ली पोलिसांनी शरजीलला ट्रांजिट रिमांड ठेवले होते.

डीसीपी राजेश देव म्हणाले की शरजीलच्या चौकशीसाठी इतर राज्यांचे पोलीस देखील दिल्लीत दाखल होऊ शकतात. तसेच भाषणाच्या व्हायरल व्हिडिओची त्यांच्याकडून करण्यात येईल. तसेच शरजील इमामच्या मागे कोणाचा हात आहे का याची देखील चौकशी होईल.