‘हिंदू हा उदात्त धर्म असून हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे हिंदू धर्मावरील हल्ला’ : शशी थरूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लेखक आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी असा दावा केला आहे की हिंदुत्व राजकीय मुद्द्यासाठी वापर करणे हे हिंदू धर्मासाठी घातक असून हा हिंदू धर्मावरील हल्ल्या आहे. ते असेही म्हणाले की, गेल्या सहस्र वर्षांपासून जागतिक कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या या धर्माने बाह्य आक्रमणांना यशस्वी प्रतिकार केला आहे, पण आता आतून होणाऱ्या हल्ल्यांमुळे मात्र तो दुबळा होण्याची शक्यता आहे.

आपल्या ‘द हिंदू वे- अ‍ॅन इंट्रोडक्शन टू हिंदुइझम’ म्हणजेच ‘हिंदू धर्म – एक परिचय’ या पुस्तकात त्यांनी अद्वैत वेदांतासारख्या हिंदू धर्माच्या महत्त्वाच्या तत्वज्ञानावर खोलवर विचार मांडले आहेत आणि धर्माचा आधार असलेल्या प्राथमिक विचारांकडे लक्ष वेधले आहे. हे पुस्तक त्यांच्या आधीच्या ‘व्हाय आय अ‍ॅम हिंदू’ या पुस्तकाच्या मालिकेचा सिक्वेल आहे.

थरूर यांनी पुस्तकात लिहिले आहे की, हिंदू धर्म उदारमतपणामुळे, इतर मतांचा आदर करण्यासाठी आणि इतरांच्या श्रद्धेचा आदर करण्यासाठी ओळखला जातो. हा असा धर्म आहे जो इतर धर्मांविरूद्ध भीती न बाळगता खंबीरपणे उभा आहे. पण हे हिंदुत्व बाबरी मशीद तोडणारे नाही किंवा जातीय राजकीय नेत्यांनी केलेले तिरस्कारयुक्त भाषण म्हणजे हिंदू धर्म अजिबात नाही.

आत्तापर्यंत जागतिक दर्जाची आणि प्रसिद्ध अठरा पुस्तके लिहिणारे थरूर म्हणाले की, हिंदुत्वाविषयी असे नकारात्मक मत आणि दृष्टिकोन मांडणाऱ्या हिंदुत्ववादी राजकारणाला विरोध करायला हवा. हिंदू धर्माचा राजकारणासाठी केलेला वापर स्वतः हिंदू धर्मासाठी घटक आहे.

Visit : Policenama.com