शशी थरूरांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

दिल्ली : वृत्तसंस्था

भाजपा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका जिंकली तर हा देश हिंदू-पाकिस्तान बनेल असे विधान काही दिवसांपूर्वी थरूर यांनी भाजपावर टीका करताना केले होते. ‘हिंदू-पाकिस्तान’ असे केलेल्या विधानावरुन सुरु झालेला वाद शमला नसताना त्यांनी अजून एक वादग्रस्त विधान केले आहे.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bab28d1-8e5d-11e8-a2a5-01e5801dfe51′]

देशातील अनेक भागांमध्ये गाय असणं हे मुसलमान असण्यापेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं विधान ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केले. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. जातीय हिंसाचार कमी झाल्याचा भाजपाच्या मंत्र्यांचा दावा वस्तुस्थितीला धरून नाही. यावरून असं वाटतं की अनेक ठिकाणी गाय असणं हे मुसलमान असण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे. असं ट्विट थरूर यांनी केलं असून त्यासोबत त्यांनी स्वतःचा एक लेख देखील जोडला आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात जमावाने गो तस्करीच्या संशयावरून २८ वर्षीय अकबर खान यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. यावर त्यांनी ट्विट करत भाष्य केलं आहे.

जाहिरात