Shatavari Benefits | शरीरात जमलेली हट्टी चरबी वितळवते ही वनस्पती, काही महिन्यातच पोट जाईल आत, ५ जबरदस्त फायदे जाणून व्हाल हैराण

नवी दिल्ली : Shatavari Benefits | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात पण यश येत नाही. तुम्ही सुद्धा असे प्रयत्न करून थकला असाल तर आता शतावरी सेवन करून पहा. ती औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखली जाते (Shatavari Benefits and Uses).

शतावरी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध बातमीनुसार, शतावरीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. इतर अनेक आजार दूर राहतात.

शतावरीचे इतर ५ फायदे

१. हिंदूस्तान टाइम्स डॉट कॉममध्ये प्रकाशित बातमीनुसार, शतावरी पुरुषांसोबतच महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. मासिक पाळीतील वेदना कमी करते. रजोनिवृत्तीमध्ये हॉट फ्लॅश, मूड बदलणे, वजन वाढणे नियंत्रित करते.

२. पुरुषांच्या स्पर्म क्वालिटी सुधारते. फर्टिलिटीची समस्या दूर होते. तिचा प्रभाव थंड आहे. शरीरातील वात आणि पित्ताचे संतुलन राखते.

३. आईच्या दुधाचे उत्पादन सुधारते. यातील फायटोएस्ट्रोजेन पेरीमेनोपॉझल पीरियड्समध्ये महिलांमध्ये हॉट फ्लॅश, मूड स्विंग बरे करते.

४. यातील घटक मनासाठी लाभदायक आहेत. रागावर नियंत्रण राहते. चिडचिड, तणाव दूर करते. गाढ झोप लागते.

५. सूज, अति रक्तस्राव कमी करण्यासाठी शतावरी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारते. तणाव आणि चिंतेपासून आराम मिळतो.

शतावरी खाण्याची पद्धत
आयुर्वेदिक तज्ञाच्या सल्ल्याने शतावरीचे सेवन करा. दुधासोबत शतावरी सेवन करणे हा उत्तम उपाय आहे. सकाळी कोमट पाण्यात किंवा दुधात शतावरी पावडर मिसळून प्या. शतावरीच्या गोळ्याही बाजारात उपलब्ध आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 70 हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात