ACB Trap News | 70 हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेवराई तालुक्यातील एका संस्थेची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय गेवराई येथे नोंद करण्यासाठी 70 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) लिपिकाला रंगेहाथ पकडले. राजाभाऊ शिंदे (Rajabhau Shinde) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लीपीकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि.24) सायंकाळी गेवराई पंचायत समितीच्या (Gevrai Panchayat Samiti) आवारात केली

याबाबत तक्रारदार यांनी बीड एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदर यांना संस्थेची नोंद सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय गेवराई येथे करायची होती. संस्थेची नोंद करण्यासाठी लिपीक राजाभाऊ शिंदे यांनी वरिष्ठांसाठी व स्वत: साठी 75 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे (Beed ACB Trap News) तक्ररार केली.

एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता लिपीक राजाभाऊ शिंदे यांनी संस्थेची नोंद करण्यासाठी लाचेची मागणी (Demanding Bribe) केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने गेवराई पंचायत समितीच्या परिसरात गुरुवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेल्या 75 हजार रुपयांपैकी 70 हजार रुपये लाच घेताना राजाभाऊ शिंदे याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिंदे याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात (Gevrai Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे (DySP Shankar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युनूस शेख
(PI Yunus Shaikh), भारत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे, रेखा मळेकर यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

Bhau Kadam | भाऊ कदमचे झाले आहे ‘लव्ह मॅरेज’; आपल्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला भाऊ, हटके लव्ह स्टोरी

Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक;
58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त