निर्दयी आईने ’लक्ष्मी’ला दूध आणि रक्त देण्यास दिला नकार, मुलाच्या आशेने महिलेने दिला 6 मुलींना जन्म…

श्योपुर : वृत्त संस्था – दूध न मिळाल्याने जेव्ही मुलगी आजारी पडली आणि तिच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली तेव्हा तिला रक्ताची आवश्यकता होती. परंतु, महिलेने बाळाला आपले रक्त देण्यास नकार दिला. तिने मुलीकडे पाठ फिरवत म्हटले की, तिला मरू द्या. अखेर एका आंगणवाडी कार्यकर्तीला त्या मुलीची दया आली आणि तिने त्या नवजात बाळाला रक्तदान केले.

ही घटना मध्य प्रदेशमध्ये श्योपुर जिल्ह्याच्या नागर गांवडा गावातील आहे. या हायटेक युगात मुलगी मुलापेक्षा कमी नाही. घोषणा सुद्धा दिली जात आहे, ’बेटी बचाओ-बेटी पढाओ’. परंतु, काही कुटुंबांची मानसिकता अजूनही बदललेली नाही.

आंगणवाडी कार्यकर्ती तिथे पोहचल्यानंतर प्रकरण उघडकीस
आंगणवाडी कार्यकर्तीनुसार, नागर गांवडा गावात सुरेश बैरवाची पत्नी रामपती बाईने मुलाच्या लालसेने सहाव्यांदा पाच महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला होता. सुमारे साडेचार महिन्यापर्यंत महिलेने मुलीला स्तनपान दिले, परंतु नंतर बंद केले. यामुळे मुलगी कुपोषित झाली.

माहिती मिळाल्यानंतर आंगणवाडी कार्यकर्ती मुलीचे वजन घेण्यासाठी पोहचली. वजन घेतल्यानंतर मुलीचे वजन खुप कमी असल्याचे आणि ती कुपोषित असल्याचे आढळले.

मुलीला दावाखान्यात दाखल करण्यास नकार
आंगणवाडी कार्यकर्तीने जेव्हा मुलगी कुपोषित असल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले तर आई रामपती तयार झाली नाही.

ज्यानंतर योजना अधिकार्‍याला प्रकरणाची माहिती देण्यात आली. अधिकारी गावात पोहचले आणि आईला समजावून मुलीला एनआरसीमध्ये दाखल करण्यात आले. जिथे तिचे वजन 3.5 किलो आणि रक्त 3.2 पॉईंट असल्याचे दिसून आले. महिला रामपतीच्या रक्ताचा नमूना घेण्यात आला जेणेकरून मुलीला रक्त चढवता येईल. परंतु रक्त मॅच होऊन देखील आईने रक्त देण्यास नकार दिला.