क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर ! वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू एकदम फिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ३ ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी निवड केलेल्या संघाची यादी जाहीर होणार आहे. भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता म्हणजे संघाचा सलामीवीर शिखर धवन संघात असणार आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकादरम्यान जखमी झाल्याने शिखर संघातून बाहेर पडला होता.

शिखर धवन बरा झाल्याने निवड समितीला आता सलामी जोडीची निवड करणे अवघड होणार नाही. शिखर बरा झाला असून त्याला वेस्टइंडीज दौऱ्यातील तिन्ही खेळासाठी म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी फिट सांगण्यात आले आहे.

विश्वचषक २०१९मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात शिखरने ११७ धावांची शतकी खेळी केली होती. याच सामन्यात शिखरच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या अंगठ्याला प्लॅस्टरही करण्यात आले होते. त्यानंतर विश्वचषकात भारतीय संघात सलामीला रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी चांगली खेळी केली होती.

दरम्यान, विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आता भारतीय संघ ३ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या १० दिवसांत तीन टी-२० सामने आणि वन-डे सीरीज खेळणार आहे. यावेळी संघात विराट कोहली असणार आहे, तर धोनीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह असताना धोनीनेच माघार घेत दोन महिन्यासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्यविषय वृत्त –