शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथे काही दिवसांपूर्वी बँकेकडे गहाण ठेवलेल्या जमिनीची बँकेच्या परस्पर विक्री केल्या प्रकरणी एका माजी मंत्री दर्जाच्या व्यक्तीसह वकील, शिक्षिकेवर गुन्हे दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री केल्याची घटना घडली असून रुपेंदरकोर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा व विजय दिनकर धुमाळ असे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरूर येथील जमीन गट नंबर ४६२ मधील जमीन विकत घेण्यासाठी रुपेंदरकोर नंदा यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँक वडगाव शेरी बँकेतून ऑक्टोबर २०१० मध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये तर मोहनसिंग नंदा यांनी सत्तर लाख रुपये कर्ज घेतले होते, सदर कर्ज घेतल्यानंतर त्यांनी सदर जमिनीचे तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून जमिनीचे गहाणखत करून दिले होते, मात्र त्यांनतर त्यांनी सदर कर्जाची रक्कम बँकेला न भरता बँकेचे कर्ज थकविले त्यांनतर २०१५ मध्ये सदर जमिनीची बँकेची फसवणूक करण्याच्या हेतूने पिंपळे धुमाळ येथील एका व्यक्तीला विक्री केली याबाबत बँकेच्या निदर्शनास सर्व प्रकार आल्यानंतर बँकेचे वसुली अधिकारी विकास राजाराम पवार वय ४३ वर्षे रा. एकता कॉलनी वारजे हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रुपेंदरकोर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा दोघे रा. सुखवाणी आर्केड अशोका म्युझ समोर कोंढवा पुणे, विजय दिनकर धुमाळ रा. पिंपळे धुमाळ ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.