…म्हणून शिल्पा शेट्टी दिसते एकदम ‘स्लिम-ट्रीम’, TikTok व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी एक फिट अॅक्ट्रेस आहे. जर तुम्हाला शिल्पा शेट्टीचं सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर आता तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तिचा फोकस फिटनेसवर असतो. शिल्पा रोज हेल्दी आणि बॅलन्स्ड डाएट घेते. नुकतंच तिनं आपलं फिटनेस सिक्रेट सांगितलं आहे. ती कशामुळे एवढी स्लिम ट्रीम आहे याचा खुलासा तिनं केला आहे. सोबतच शिल्पा वर्कआऊट आणि योगाही करते. पूर्ण आठवडा ती काय खाते हे आपण जाणून घेणार आहोत.

शिल्पाचा एक टिकटॉक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात ती आपला डाएट सांगत आहे. आपलं डाएट सिक्रेट सांगताना शिल्पानं सोमवार ते रविवार ती काय खाते हे तिनं सांगितलं आहे.

@theshilpashetty

Rok sako toh rok lo…😂🍫🍮🍦🍰@gunjanshouts #tiktokfoodie #sundaybinge #fyp #tiktokindia #weekend #fun #sunday

♬ original sound – Shilpa Shetty

शिल्पाचं डाएट सिक्रेट-

सोमवार- ग्रील पनीर
मंगळवार- बीटरूट चिला
बुधवार- भोपळ्याचं सूप
गुरुवारी- खिचडी
शुक्रवार- स्टीम फिश
शनिवार- राजमा भात
रविवार- पॅन केक, आईसक्रिम, मलाई, दही, पाणी पुणी, रसगुल्ला, चॉकेलट केक असं काहीही खाते.

शिल्पा सकाळी लवकर उठते आणि कोमट पाणी पिते. यानंतर ती नोनीचा रस पिते. रात्रीचं जेवण ती 7.30 वाजताच घेते. ती कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन फूड घेते. तिला इंडियन फूड खूप आवडतं. तिला तिच्या आईचं जेवण खूप आवडतं.