शाळेची बस दरीत कोसळून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यु

हिमाचल प्रदेश : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेश मध्ये सगळ्यात मोठा अपघात आहे. शाळेची बस दरीत पडल्याने विद्यार्थ्यांची आणि बस चालकाचा मृत्यू झाला आणि अनेक विद्यार्थी जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमी विद्यार्थांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहे.

शाळकरी विद्यार्थांना घेऊन जाताना झंझीडी येथे हा अपघात झाला. हे सांगितले जात आहे की एचआरटीसी बस चेल्सी स्कूलमधून मुलांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. घटना झाल्या झाल्या खूप मोठा आवाज आणि विद्यार्थांच्या आवाजामुळे आजू बाजूच्या लोकांनी पटकन धाव घेत घटना स्थळी पोहचले आणि विद्यार्थांना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी चालक मृत्युमुखी झाल्याची माहिती मिळाली, पण उपचारा दरम्यान २ विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी आहेत. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

जखमी विद्यार्थाना आईजीएमसी येथे दाखल करण्यात आले. शिमलाचे पोलीस अधीक्षक ओमापति जंबाल म्हणाले की जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. पण पोलीस याचा तपास करत आहेत. प्राथमिक पथक सध्या मदत करत आहे. बस खाली पडलेल्या विद्यार्थांना काढण्यात यश आले आहे. पोलिसांची शोध मोहीम सध्या आजून चालू आहे.

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन