Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य उद्या ठरणार, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

मुंबई : Shinde-Fadnavis Government | भाजपाच्या (BJP) मदतीने एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) मोठे बंड घडवून आणले आणि राज्यातील मविआ सरकारला (Maha Vikas Aghadi Government) सत्तेतून खाली खेचून शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपाने सत्ता स्थापन केली. यासर्व घटनाक्रमात ज्या-ज्या घडामोडी घडल्या त्या किती घटनात्मक होत्या किंवा घटनाबाह्य होत्या, हे खुप महत्वाचे ठरणार आहे. कारण यावरच शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) भवितव्य ठरणार आहे. या सत्तांतर नाट्याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल याचिकांवर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार आहे. या सुनावणी कोणता निर्णय होतो, त्यावर शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) भवितव्य ठरणार आहे.

5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) यांचे हे घटनापीठ (Constitution Bench) आहे. या घटनापीठात न्या. एम.आर. शाह (Justice MR. Shah), न्या. हिमा कोहली (Justice Hima Kohli), न्या. नरसिंहा (Justice Narasimha), न्या. कृष्ण मुरारी (Justice Krishna Murari) यांचा समावेश आहे. यापूर्वी 7 सप्टेंबरला या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात केवळ 10 मिनिटे सुनावणी झाली होती.

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना
निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी बजावली होती,
या 16 आमदारांना निलंबित करावे, अशी याचिका शिवसेनेने दाखल केली आहे.

तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती,
त्याविरोधात शिवसेनेची याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा
होते, असा दावा करणारी याचिका शिवसेनेने केलेली आहे.

तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याच्या बजावलेल्या
नोटीसविरोधात शिंदे गटाने याचिका दाखल केली आहे. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची याचिका
शिंदे गटाने दाखल केली आहे.

Web Title :- Shinde-Fadnavis Government | a hearing will be held tomorrow in the supreme court on the political crisis maharashtra eknath shinde uddhav thackeray shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कंपनी मालकाने महिला कर्मचार्‍याच्या घरी जाऊन केली अश्लिल शिवीगाळ; कोरेगाव पार्कमधील पॉश सोसायटीतील घटना

NCP | आधी म्हणाले, मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क…, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला!