NCP | आधी म्हणाले, मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क…, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP | राज्यात जिल्हानिहाय पालकमंत्र्याची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) केली नव्हती, यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनाचा कारभार थंडावला होता. यावरून विरोधकांनी टीका सुरू केल्याने अखेर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, एका-एका मंत्र्याकडे दोन-दोन जिल्हे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तब्बल 6 जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याने विरोधकांना आयतेच कोलीत सापडले आहे. यावरून आता विरोधक टीका करत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालकमंत्री (Guardian Minister) पदावरून फडणवीसांची खिल्ली उडवल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्विट करत फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

 

रविकांत वरपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आधी म्हणाले, मी सरकारमध्ये सामील होणार नाही. नंतर उपमुख्यमंत्री झाले. नंतर गृहमंत्रीपदासह 8 ते 9 खात्यांचे मंत्री झाले आणि आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री! मी सरकारमध्ये सामील होणार नाही, असे म्हणत वरपे यांनीही फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

 

वरपे यांनी मंत्रिमंडळात समावेश न केल्याने नाराज असलेले आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनाही चिमटा काढला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. 50 खोके! एकदम ओके!

 

दरम्यान, अजित पवारांनी सुद्धा आज बारामतीमध्ये बोलताना 6 जिल्ह्याचे पालकमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, माझ्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते, तर माझ्या नाकीनऊ येत होते. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी संध्याकाळी जाहीर केली. ही यादी खालील प्रमाणे –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), अकोला (Akola), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli)

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) – अहमदनगर (Ahmednagar), सोलापूर (Solapur)

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) -चंद्रपूर (Chandrapur),गोंदिया, (Gondia)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)- पुणे (Pune)

विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) – नंदुरबार (Nandurbar)

गिरीश महाजन (Girish Mahajan) – धुळे (Dhule),लातूर (Latur), नांदेड (Nanded),

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – बुलढाणा (Buldhana), जळगाव (Jalgaon)

दादा भुसे (Dada Bhuse) – नाशिक (Nashik),

संजय राठोड (Sanjay Rathod) – यवतमाळ (Yavatmal), वाशिम (Washim)

सुरेश खाडे (Suresh Khade)- सांगली (Sangli)

संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) -औरंगाबाद Aurangabad (छत्रपती संभाजीनगर-Chhatrapati Sambhajinagar)

उदय सामंत (Uday Samant) – रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad)

तानाजी सावंत (Tanaji Sawant) -परभणी (Parbhani), उस्मानाबाद Osmanabad (धाराशिव-Dharashiv)

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) – पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg)

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – हिंगोली (Hingoli)

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) – मुंबई शहर (Mumbai City), कोल्हापूर (Kolhapur)

अतुल सावे (Atul Save) – जालना (Jalna), बीड (Beed)

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) – सातारा (Satara), ठाणे (Thane)

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) -मुंबई उपनगर (Mumbai Suburb)

 

Web Title :- NCP | ncp ravikant varpe mocks devendra fadnavis bachchu kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक

Ashish Shelar | भाजपाच्या शेलारांचा शिवसेनेला सवाल, पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?