Shinde Government | शिंदे सरकारचा मविआला आणखी एक धक्का, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारने (Shinde Government) महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai CP Parambir Singh) यांच्यासोबत निलंबित (Suspended) केलेले पोलीस उपायुक्त पराग मणेरे (DCP Parag Manere) यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. पराग मणेरे यांची पुन्हा नियुक्ती केली आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) परमबीर सिंग यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांना निलंबित केले होते. मात्र आता शिंदे सरकारने ( Shinde Government) परमबीर सिंग यांना दिलासा देत मणेरे यांचे निलंबन रद्द केले आहे.

 

पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यावर कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Market Police Station Kalyan) गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ आणि कोपरी पोलीस ठाण्यात (Kopri Police Station) धमकावणे आणि पदाचा गैरवापर करणे या स्वरुपाचे गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पराग मणेरे यांना ठाकरे सरकारने (Thackeray Government) निलंबित केले होते. ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पूर्ण पोलीस लॉबी कमजोर करत बदल्या आणि निलंबन केले होते. त्या पोलिसांना (Maharashtra Police) आता महत्त्वाची पदं दिली जात आहेत.

 

काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने घेतला होता.
याच प्रकरणात पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action) करुन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
मात्र, आता पुन्हा एकता पराग मणेरे यांना सेवेत घेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.

 

 

 

Web Title :- Shinde Government | re appointment of suspended police officer parag manere big decision of shinde bjp govt

 

Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड

 

Maharashtra  Political Crisis |  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

 

CNG Price Hike | सीएनजीच्या  दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग