एक ‘ठेच’ लागल्यामुळं मिळाला 50 लाखांचा ‘हिरा’, रातोरात बदललं एका ‘मजुराचं’ भविष्य !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हिऱ्यांची नगरी या नावाने देश आणि जगात प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की भगवान जुगल किशोर यांच्या नगरीत कधी कोणाचेही नशीब चमकू शकते, त्याची कितीतरी जिवंत उदाहरणे आहेत. मंगळवारी आनंदी लाल कुशवाह नावाच्या एका मजुरालाही पन्ना नगरीने रंकाचा राजा बनवले, कारण त्याला मौल्यवान उज्ज्वल जॅम क्वालिटीचा हिरा मिळाला, ज्याची किंमत अंदाजे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त सांगितली जात आहे. साधारणत: 1 कॅरेट हिऱ्याची किंमत 5 लाख रुपये असते आणि या मिळालेल्या हिऱ्याचे वजन 10 कॅरेटपेक्षा जास्त आहे.

पन्नातील राणीपूरच्या उथली डायमंड खाणीतून मजूरला हा हिरा तेव्हा मिळाला जेव्हा त्या खाणीत त्याला एक ठोकर लागली. कामगार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हिरा कार्यालयात जमा केला आहे. आता हा हिरा आगामी लिलावात ठेवला जाईल ज्याची खुली बोली लावण्यात येईल आणि जी सर्वाधिक बोली असेल ती या हिऱ्याची खरी किंमत असेल. यानंतर सर्वात जास्त बोलीच्या रकमेतून डायमंड कार्यालय कर म्हणून सुमारे 12 टक्के कपात करेल आणि उर्वरित 88 टक्के रक्कम हिरा धारकास देईल.

वास्तविक, कोरोना संसर्गामुळे 25 मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. जसा देश अनलॉक होणे सुरू झाला तसे पन्नामधील उथली हिरा खाणींमध्ये काम सुरू झाले. लॉकडाऊन नंतर हा पन्ना हिरा कार्यालयात पहिला मोठा हिरा जमा करण्यात आला आहे. त्याचवेळी, कामगार असे म्हणतात की भगवान जुगल किशोर यांची त्याच्यावर कृपा झालेली आहे. पूर्वी या खाणीतूनच त्याला 70 सेंट चा हिरा मिळाला आहे आणि आता त्याला 10.69 कॅरेटचा मौल्यवान हिरा मिळाला आहे. हिरा मिळाल्यानंतर मजुराचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे चेहरे फुलले आहेत की शेवटी पन्नाच्या रत्नगर्भा धरतीने मजुराला त्याच्या कष्टाचे फळ दिले आहे.