अभिनेत्री जायरा वसीम धर्माची चुकीची प्रतिमा तयार करतेय : शिवसेना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये आल्यापासून लोकांनी मला भरभरुन प्रेम दिले आणि पाठबळ देखील. मात्र अभिनेत्री बनल्यामुळे इस्लाम धर्मापासून दूरावा निर्माण झाला होता. धर्म आणि माझ्यातील अंतर कमी करण्यासाठी मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे जायराने स्पष्ट केले आहे. पंरतू यावर शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदीने जायराच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली संतापजनक प्रतिक्रिया –

तुला जर तुझ्या धर्माचे पालन करायचे असेल तर ते तु कर पण कृपया धर्माला करिअर मध्ये आणू नको. धर्माला असहिष्णु असल्याचे सांगितले पण प्रत्यक्षात तसे नाही. जायराचे धर्माविषयी असे सांगणे चुकीचे आहे असे ट्विट करत चतुर्वेदी यांनी जायरावर टीका केली.

रविना टंडन भडकली – 

जायराच्या या विधानानंतर अनेकांनी तिला घेरण्याचा प्रयत्न केला. रविना टंडन देखील तीच्या या विधानावर चांगलीच भडकली. अभिनेत्री रविना टंडन हिने ट्विट करत जायराच्या निर्णयावर आणि विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रविना म्हणाली की, बॉलिवूडने खूप काही दिले आहे. मात्र केवळ दोन चित्रपटात काम करणारे लोक या इंडस्ट्रीत खूश नसतील तर काहीही फरक पडत नाही. अशांनी शांत पणे हे क्षेत्र सोडावे आणि उलट्या दिशेने जाणारे त्यांचे विचार त्याच्या पुरते मर्यादित ठेवावेत असा टोला देखील रविनाने जायराला लावला.

भाजपने मात्र जायराच्या निर्णयाची पाठराखण केली आहे. जायराने दबावाखाली येऊन बॉलिवूडमधून एक्झिट होण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपने सांगितले आहे.

 

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध