शिवसेनेसारखी कामे करू नका, चंद्रकांत पाटालांचा भाजपा नगरसेवकांना सल्ला

पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा. वार्डातील सर्व कामे मार्गी लावा. निवडणुकीआधी आश्वासन द्यायचे आणि पुन्हा विसरायचे अशी शिवसेनेसारखे काम आपल्याला करायची नाहीत, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजप नगरसेवकांना देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

पुण्यातील एका विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शिवसेनेने निवडणुकीआधी 100 युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचे बील दिले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजार रुपयांचे विजबील आकारण्यात आले आहे. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो.

वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करा- पाटील
निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करा. जनतेला दिलेल्या आश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी तयार करायला हवी. आपली कोणती कामे राहीली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील, असा सल्ला पाटील यांनी नगरसेवकांना दिला आहे.