Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) करुन सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेने (Shiv Sena) नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Corporation Election) स्वबळावर लढवण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी महापालिका निवडणुक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरु केली असून शिवसेना सर्व जागा लढवणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे नाशिक (Nashik) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिली आहे.

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45%

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे 5 दिवसांच्या नाशिक (Nashik) आणि उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) दौऱ्यावर येत आहेत.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे.
पुढील वर्षी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी करत स्वबळाचा नारा दिला आहे.

सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक (Corporator) आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर मोठी आणि महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले होते.
माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.
परंतु त्यांची कमी झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी पक्षाने बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

पुढचा महापौर शिवसेनेचा – संजय राऊत
नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत पुढील महापौर (Mayor) हा शिवसेनेचा असेल अशी राजकीय भविष्यवाणी केली आहे. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊतांच्या या घोषणेमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणूनघ्या

 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर