शिवचरित्र पारायण : एका बदलाची सुरुवात

मुळशी : पोलीसनामा ऑनलाईन

मुळशी तालुका म्हणलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहत ते औद्योगिकीकरणं आणि जमिनींचा वाढत भाव. मात्र या गोष्टींना तालुक्यातील लवळे हे गाव अपवाद ठरले आहे. या गावात शिवचरित्र पारायण व दुर्गा माता दौड यांसारख्या कार्यक्रमातून मोठे परिवर्तन झाले आहे.

पुणे शहराला लागूनच असलेला शिवरायांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका एकेकाळी निसर्गसंपन्नतेसाठी प्रसिद्ध होता. मात्र याठिकाणी औद्योगिकीकरणं आले आणि गावांचा कायापालट झाला. औद्योकीकरणामुळे गावची मूळ संस्कृती हरवू लागली. मात्र गेल्या वर्षापासून स्थानिक तरुणाईच्या सहभागाने या गावात चांगले उपक्रम सुरु झाले आहेत. या गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन शिवचरित्र पारायण सुरु केलं आणि गावच चित्रच बदलून गेलं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db90aa9c-ce1b-11e8-ad1e-cdf582a93a6f’]

पिरंगुट या गावात सुरुवातीला हा उपक्रम सुरु केला होता. त्या उपक्रमापासून प्रेरित होऊन गावच्या काही तरुणांनी लवळे या गावात शिवचरित्र पारायणाची सुरुवात केली. हा उपक्रम आधी वस्तीवरच्या मंदिरात ४-५ लोकांच्या उपस्थितीत सुरु झाला होता . याला आता भरभरून पाठिंबा मिळत आहेत. गावात दर सोमवारी विठल-रुक्मिणी मंदिरात या उपक्रमाला आता १०० ते १५० लोक उपस्थित राहत आहेत. यात तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. यात शिवकार्यावरचे श्लोक तसेच पारायण घेतले जाते. २८ नोव्हेंबरला या उपक्रमाला वर्षपूर्ती होत आहे. या प्रभावी उपक्रमाला गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

[amazon_link asins=’B079QMD98D,B075ZV72GW,B07BCZX3WT,B072MV5WKF,9352774396,B07BQNT12Y,B01N03ZPPA,B07F8B48JR,B07FFR11NH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd82b36f-ce1b-11e8-aa92-d5b0d3f37edb’]

या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून, पारायण करणाऱ्या गावातील तरुणांनी नवरात्रात “दुर्गा माता दौड” हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला हा उपक्रम ९ दिवस चालणार आहे. या उपक्रमात महिलाही विशेष सहभागी आहेत. ९ दिवस वेगवेगळ्या भागात ही फेरी / दौड काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महिलांनी रात्री २ पर्यंत जागून रांगोळी व सजावट केली . दोन ओळींमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने ध्वज घेऊन दौड करणारे तरुण शिवचरित्राची गाणी म्हणत चालतात. गावातल्या महिला ध्वजाचे पूजन व त्याचे औक्षण करतात. यानिमित्त संस्कृतीची जपणूक व लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमुळे गावच्या वातावरणात एकदमच बदल घडून आला आहे. यापूर्वी चौकाचौकात उभी राहणारी तरुणाई आता या उपक्रमात सहभागी होत आहेत. या उपक्रमांचे यश म्हणजे गावातली मुले व्यसनाधीनतेपासून दूर राहू लागली आहेत.