Shivani Dandekar | ‘या’ कारणामुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार अशी फरहान अख्तरची ओळख आहे. फरहान आणि त्याची प्रेयसी शिवानी दांडेकर (Shivani Dandekar) हे नेहमीच चर्चेत असतात. फरहानने आजवर आपल्या अभिनयाच्या त्याचबरोबर लेखनाच्या कौशल्याने सगळ्यांवर भुरळ पाडली आहे. फरहान अनेकदा त्या दोघांचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र यंदा त्याने शेअर केलेल्या फोटोमुळे सध्या शिवानीला (Shivani Dandekar) ट्रोल केले जात आहे.
फरहानने पत्नी शिवानी दांडेकर सोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवानीच्या कपड्यांमुळे ती सध्या अडचणीत आली आहे. यावेळी शिवानीने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. तिच्या या गाऊन वरून सध्या तिची सर्वत्र खिल्ली उडवली जात आहे. या फोटोवरून हे दोघे एका इव्हेंट मध्ये असल्याचे दिसत आहे. यावेळी शिवानीने काळ्या रंगाचा स्किनी गाऊन घातला आहे. तिच्या या गाऊनचा गळा खूपच स्टायलिश असल्याचे दिसत आहे. मात्र हा तिचा लूक लोकांना फारसा काही आवडले नसल्याचे नेटकऱ्यांनी कमेंट करून सांगितले आहे.
फरहान अख्तर ने त्याच्या instagram वर हे फोटो शेअर केले असून यामध्ये फरहान सूटबूट मध्ये दिसत आहे. तर शिवानीने (Shivani Dandekar) परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला लोकांनी ट्रोल केले आहे. कपलच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर हा फोटो सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या आधी देखील फरहानच्या अनेक फोटो मुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. तर यापूर्वी instagram वर फरहानने त्याचा आणि शिवानी चा स्विमिंग पूल मधील एक फोटो शेअर केला होता. हा फोटो अनेकांच्या पसंतीस पडला होता. मात्र अनेकांनी या दोघांना ट्रोल देखील केले होते.
Web Title :- Shivani Dandekar | shivani dandekar was trolled because of her black gown see the photo
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Beed Crime | बीड हादरलं ! अनैतिक संबंधातून प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ; देसी लुकला दिला बोल्डनेसचा तडका