Satara Shivshahi शिवशाही बस उलटून सात प्रवासी गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्याच आठवड्यातील शिवशाही बसला झालेलया अपघाताचे वृत्त ताजे असताना सातारा येथील उंब्रज नजीक पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ‘बोरीवली -कराड ‘ शिवशाही बसला पुन्हा अपघात झाला आहे. या अपघातात ७ प्रवासी गंभीर झखमी झाले आहेत. बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे बस उपमार्गावर पलटी झाली. जखमींना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,आज सकाळी ‘बोरिवली -कराड ‘ शिवशाही ( एम. ए – ४७ वाय / २४५८ ) ही बस भरदाव वेगाने सातारा कराड मार्गावरून चालली होती. बस वराडे गावाच्या हद्दीजवळ आली आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटून बस उपमार्गावर येऊन पलटी झाली. यात ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत . काही दिवसांपासून राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाहीच्या ताफ्यात खाजगी कंपनीच्या जुन्या ट्रॅव्हल्स गाड्या दाखल केल्याचे समजते आहे. तसेच या गाड्यांसाठी वाहनचालक देखील सामान्य एस टी चालकच असल्याचे कळाले होते यावरून आता शिवशाहिच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.