Shivchatrapati Sports Award | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : Shivchatrapati Sports Award | राज्य शासनाच्या (Maharashtra State Govt) क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी, प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे (Chandrakant Kamble) यांनी केले आहे. (Shivchatrapati Sports Award)

क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. (Shivchatrapati Sports Award)

फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे काही खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९- २०,
२०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत.
यास्तव अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये व खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अशा खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत.

पुरस्कारासाठीचे अर्ज आणि माहिती क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहितीही क्रीडा विभागाने दिली आहे.

Web Title : Shivchatrapati Sports Award | Calling for Sportsmen to Apply for Shiv Chhatrapati State Sports Award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी