Shivendra Raje Bhosale | ‘उदयनराजे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना फक्त डोंबाऱ्याचा खेळ येतो’- शिवेंद्रराजे भोसले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shivendra Raje Bhosale | सातारा नगरपालिकेची (Municipal Council, Satara) निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे तसे सातारच्या दोन्ही राजांचे आरोप प्रत्यारोपण सुरू झाले आहेत. भाजपचे खासदार (BJP MP) उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) आणि आमदार शिवेद्रराजे भोसले यांच्यात वाद पेटला आहे. साताऱ्यामधील शिवेंद्रराजेंच्या (Shivendra Raje Bhosale) ताब्यात असलेल्या अजिंक्यतारा कारखान्यामध्ये (Ajinkyatara Sugar Factory) भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला होता. याचा पार्श्वभूमीवर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर बोचरी टीका केली आहे.

 

कारखाना हा लोकांच्या कष्टावर उभा केलेला आहे. कारखान्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे. तो वेळ आली की मी हे उघड करणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुद्दामहून गळचेपी केली जात आहे, असं उदयनराजे म्हणाले होते. यावर शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

कारखान्यामध्ये जे ऊस घालतात त्यांनीच कारखान्याबद्दल बोलायचं. उदयनराजे सभासद नसल्याने उसाचा आणि त्यांचा संबंध नाही, त्यांनी कधी शेती केली नाही.
वाढत्या वयासोबत त्यांची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी टीका केली आहे.
साताऱ्यातील (Satara) एक सोसायटी ताब्यात घेतली यावेळी विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली होती.

दरम्यान, सगळीकडे भ्रष्टाचार (Corruption) असल्याने त्यांना सर्वत्र भ्रष्टाचारी दिसत आहेत.
दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावताना त्यांनी स्वत: आत्मचिंतन (Introspection) करावे.
विनाकारण सर्वसामान्य लोकांना (Ordinary people) चेंगरण्याचे काम करू नये, असंही उदयनराजे यांनी म्हटलं होतं.
मात्र आता शिवेंद्रराजेंनी केलेल्या टीकेवर उदयनराजे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Shivendra Raje Bhosale | Shivendra Raje Bhosale On Udayan Raje Bhosale Satara Municipal Council Elections

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा