Shivraj Singh Chouhan | शिवराज सिंह भावूक, निवडणूक लढवणार नाहीत? म्हणाले….

बुधनी : Shivraj Singh Chouhan | लवकरच पाच राज्यांची विधानसभा निवडणूक (Madhya Pradesh Vidhan Sabha) जाहीर होणार आहे, यामध्ये मध्य प्रदेशचा सुद्धा समावेश आहे. यामुळे येथील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह आगामी निवडणूक लढणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. येथील एका सभेत शिवराज सिंह यांनी उपस्थित लोकांकडूनच कौल मागितला, त्यावेळी लोकांनी मामा…मामा…अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवराज सिंह भावूक झाले होते. (Shivraj Singh Chouhan)

बुधनी हा शिवराज सिंह यांचा मतदारसंघ आहे. बुधनीमध्ये शिवराज सिंह यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी मतदारांना प्रश्न केला की, इथून निवडणूक लढवू की नको. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या वक्तव्याचे विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (Shivraj Singh Chouhan)

बुधनीच्या सभेत शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी राजकीय परिभाषा बदलली आहे.
काँग्रेसचे सरकार तुम्ही अनेक वर्षांपासून पाहिले आहे. कधी जनतेसाठी अशी चिंता असते का, मी सरकार नाही तर
कुटुंब चालवत आहे. असा भाऊ भेटणार नाही. जेव्हा मी निघून जाईन तेव्हा माझी खूप आठवण येईल, असे भावनिक
उदगार शिवराज सिंह यांनी काढले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis & Ajit Pawar | आधी मुख्यमंत्र्यांची हिंमत नव्हती, आता अजितदादांच्या निर्णयाला उपमुख्यमंत्री फडणवीस स्थगिती देतात – भास्कर जाधव

Rohit Pawar | कारखान्यावरील कारवाईनंतर रोहित पवारांचे खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘एका नेत्याबद्दल अंदाज योग्य होता, पण…’

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 47 वी स्थानबध्दतेची कारवाई

Avinash Sable-Asian Games 2023 | आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने जिंकले दुसरे पदक

Sushma Andhare On Tanaji Sawant | आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे